पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बायकॉट

इमेज
मेंढरांचा बायकॉट सिनेमा म्हटल कि ; बंद हॉल मध्ये "सत्तर एमएम" पडद्यावरील घडणाऱ्या कथेतील नायक/नायिकेत आपले अस्तित्व कल्पना करून त्याच्या सुख-दुखात स्वत:ला काही तास विसरणे होय. करमणूक हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. दिवसभरातल्या वैयक्तीक, सामाजीक, कौटुंबिक  दगदगीच्या आयुष्यातून काही क्षण स्वत: साठी विरंगुळा हवाच.प्रत्येकाला इथ मनोरंजन हवंच आहे.त्यात तर मोबाईल आल्या पासून त्यात कसलीही कमतरता होत नाहीच म्हणा. पण 'पिच्चर' म्हटल की थेटरात फुल शिट्ट्या, टाळ्या, हसणं रडणं हे ओघानं आलंच.  कोरोना काळात सिनेमाची खूप कमतरता भासली.अर्थात बंधनांच स्वागतच केलं सर्वांनी.कारण "जान है;तो जहाँ है!"   पण त्याही काळात मोबाईल,टीव्हीवर विरंगुळा दिलाच असेल तर तो सिनेमानेच! लॉकडाऊननंतर तरी सिनेमाने मोकळा श्वास घ्यावा हीच अपेक्षा! पण समाजच वैचारिक लॉकडाऊन मध्ये फसला असेल तर...?  हजारो लोकांच्या मेहनतीने उभा रहाणारा आपला सिनेमा जेव्हा थेटरात येतो तेव्हा त्यावर सर्वांनी  भरभरून प्रेम करावं अशी अपेक्षा ही त्या हजारोंच्या घरच्यांनाही असते ज्यांच्या रोजी- रोटीचे साधनच स...