पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तू तशीच रहा..

तू तशीच रहा वेंधळ्यासारखं वागून सुद्धा मी, तुझं ते मला समजून घेणे  जसं खळाळणाऱ्या ओढ्याला, नदीने आलिंगन देणं. माझ्या आडदांडपणाला सहन करून, नजरेने उमजून घेणे. जसं गडगडणाऱ्या नभांना, विजेन ताकीद देणं. सर्व काही आजही आठवतंय  तू तेव्हाही बरोबर होतीस  आजही तू तशीच रहा  मी नसेल सोबत तरी  तू मात्र तशीच रहा  तू मात्र तशीच रहा.        - Vdson